|| गॅलव्हेटन || Poem by Rajeev Deshpande

|| गॅलव्हेटन ||

अफाट पसरल्या दर्याला
अखंड भूमीचा किनारा
चकीत करतो दृष्टीला
सृष्टीचा नजारा न्यारा

दूरवर जल लहरींचा
पसरला पसारा सारा
धुडगूस घाले बेफाम
स्वैरभर स्वच्छंदी वारा

धुक्यात विरल्या तटांवर
धडकतो लाटांचा मारा
बेभान मनाला सावरतो
शीतल तुषारांचा शहारा

होता उजेड, अंधार आता
खेळ अजब गजब न्यारा
धुसर दमट अवती भवती
क्षणात झरझर जलधारा

बघता बघता बदलतो
निसर्ग रमणीचा नजारा
तटस्थ अढळ निश्चल
बघत राहे दूरवर तारा!

~ राजीव निळकंठ देशपांडे

POET'S NOTES ABOUT THE POEM
This poem is about beauty of Galveston Island, Houston, Texas, USA.
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success