यावे, स्वागत आहे! Poem by Rajeev Deshpande

यावे, स्वागत आहे!

दशदिशे कडूनी अनाहूत साद असतो
क्षितीजी अवनी आकाशाचा संवाद असतो

प्रपात झेलण्या आतुर पर्वताचा कडा असतो
मातृभूमी वरती पारिजातकाचा सडा असतो

ऋतुराज निसर्ग नटराज नटवित असतो
टवटवीत दाट झाडात चिवचिवाट असतो

बांग वेळ सकाळ कोंबडा पाळीत असतो
पात्यांना वारा गार कुरवाळीत असतो

स्वार वा-यावर मातीचा ओला गंध असतो
धुंद पहाटे जाई जुईचा सुगंध असतो

पूर्व पश्चिमेस रविराज खुलवित असतो
चांदराती शशिराज भान भुलवित असतो

शुभाशिष देण्या आतुर शंकर भोळा असतो
नवनीतावर शुभ्र श्रीरंगाचा डोळा असतो

उधळण्यास आनंद निसर्ग मेळा असतो
भूलोकी जीवन देवदुर्लभ सोहळा असतो!

(दै. मातृभूमी)

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success