चैतन्य Poem by Rajeev Deshpande

चैतन्य

झरता श्रावण धारा, खुलून आली धरती
खाली दाट हिरवळ, मेघांची दाटी वरती

मोर पिसारा, निसर्ग पसारा, इन्द्रधनु वरती
साज हिरवा, गंध मरवा, नटलेली धरती

खेळ ऊन पावसाचा, पक्षी क्रिडा करती
तरुवरी बघूनी सुमने, तनमने भान हरती

तुडुंब भरले पाणवठे, डरांव मेंढक करती
वसुंधरे वर ओल्या हरित, गाई गुरे चरती

प्रसन्नतेने ठाण मांडले, नैराश्य बाधा हरती
शिडकावे शुभ शकुनाचे, प्राण सृष्टीत भरती

फुटला बांध सणांचा, राउळ॓ भक्तांनी भरती
कुणी सोडती संकल्प, कुणी उपवास धरती

घेऊन कावड भगत, स्मरण शिवाचे करती
ताशे ढोल धडाडा, शंखनाद हुंकार गरजती

आतुरतेनी वाट श्रावणाची, बघता मने झुरती
न कळ॓ भिजल्या आनंदाचे, दिन कधी सरती!
(दै.मातृभूमी)

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success