शोध Poem by Rajeev Deshpande

शोध

अफाट जग पसा-यात
हरवलेला प्रत्येक जण
वणवण भटकत रहातो
मार्ग सापडत नाही पण

प्रत्येकाचे महत्त्व आपले
आपले स्वतंत्र 'मी' पण
हक्क सांगतो ठासून इथे
पर्वत धोंडा मातीचा कण

प्रत्येकाचे दुःख आपले
आपल्या जखमांचे व्रण
अहंकाराच्या कुरघोडीत
आपले आपल्याशी रण

दुर्लभ दुर्मिळ जन्म इथला
हवा हक्काची इथले आंदण
निष्कपट वर्तन ठरते इथे
सार्थकी जीवनाचे कारण!

(दै. मातृभूमी)

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success