// वनराई // Poem by Rajeev Deshpande

// वनराई //

निळं नितळ तळं
झुळुक झुळझुळ
झ-याची खळखळ हो.........

पक्षांची वरदळ
हवेत दरवळ
पानांची सळसळ हो.......

रानात खळबळ
खुरांची पळापळ
क्षणात हळहळ हो........

उन्हं ती टळटळ
कातळं जळजळ
वाट ती डळमळ हो........

Friday, December 30, 2016
Topic(s) of this poem: nature
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success