।। स्वच्छंदी ।। Poem by Rajeev Deshpande

।। स्वच्छंदी ।।

फिरकीच्या नादात
नित्याच्या छंदात
नस्त्यात्या फंदात
वाहतो वात....

चंद्राच्या कवेत
झोंबत्या हवेत
डोलत्या नावेत
जागते रात....

फुलांच्या बागात
लटक्या रागात
प्रितीच्या मागात
खुलते नात....

स्वरांच्या लाटात
शब्दांच्या घाटात
तालाच्या थाटात
डोलते गीत....

अंधुक हो-यात
एकांती खो-यात
ज्वानीच्या तो-यात
भुलते रीत....

स्वप्नांच्या देशात
फुलांच्या वेशात
मनाच्या कोषात
फुलते प्रीत....

Monday, July 27, 2015
Topic(s) of this poem: freedom
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success