मुखवटा Poem by dhirajkumar taksande

मुखवटा

Rating: 5.0

रंग सरड्यांचे वदनी पडू लागले
मुखवट्याखाली चेहरे दडू लागले

दृष्टी जाणु कशी मी कुण्या लोचना
भिंग बुबूळांवरही जडू लागले

संत फकिरास भला मी समझू कसा
तेही अबलांवरती चढू लागले

माणसे तोडणारा मुखवटा कोणता
आज सत्कार त्यांचेही घडू लागले

युद्ध होणार  वाटे पावलोपावली
बुद्ध अंतरमनातील झडू लागले

Sunday, September 7, 2014
Topic(s) of this poem: facebook
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success