जागी हो Poem by dhirajkumar taksande

जागी हो

धर्मार्ंध विषमतेची,
होत आहेस तु कळी पुन्हा.
शिक्षणाच्या शस्त्राविणा,
जाइल तुझा बळी पुन्हा

तुच हो जागी
दगडं जागृत करण्यापेक्षा
बुध्दीमत्तेच्या अभावाणे
बुडशी अज्ञान तळी पुन्हा

सामर्थ्य तुझ्या अंगी
अवकाश कवटाळण्याचे
विज्ञानाच्या अस्त्राविणा
तव नशिब दळणे दळी पुन्हा

जान पुरुषी अहंकार
वाचव तुझी अस्मीता
हाती तुझ्या लेखनीवीना
निरक्षरता येईल गळी पुन्हा

गीरव नव भवितव्य
दे उभारी शिक्षणाला
तुझ्या वर्तनाणे दिसू दे
तु सावित्रीच्या दळी पुन्हा

Sunday, January 4, 2015
Topic(s) of this poem: human condition
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success