दोन बाजु Poem by dhirajkumar taksande

दोन बाजु

Rating: 5.0

जेव्हा सुख शोधत होतो
तेव्हा दुःख पाठीमागे उभे होते
जेव्हा दुःखाला कवटाळले
तेव्हा सुख पाठीमागे उभे होते
जेव्हा मरण शोधत फिरलो
तेव्हा जीवन फुलत होते
जेव्हा जगावेसे वाटले
तेव्हा मरण पाठीमागे उभे होते
दिव्यालाही दिसत नाही अंधार
निशाला भेटत नाही उषा
मिळत नाही कधी एकमेकांना
दोन समांतर रेषा

Sunday, September 14, 2014
Topic(s) of this poem: sadness
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success