रमाई Poem by dhirajkumar taksande

रमाई

Rating: 5.0

माय माझी माऊली
भीमबा होता निळा
वाहिला होता तीने
भाळी सूर्याचा टिळा

वणवण फिरुनी केली
जीवा देहाची मोळी
गोडवा ठायी तीच्या
जशी पूरणाची पोळी

संसारी खपताना
माया ढगावानी झरे
फुलास जपताना
काटे तीजसाठी उरे

कुठे दड़वले सारे
ना रुसवा ना वाद
वेगळ्या संसाराचा
नव्हता मनी नाद

घरामधे पैशाचा
दुष्काळ सदा वसे
दागिण्यास मोडून
गाढा ओढत असे

उपचारा अभावी
मुलगा दगावला
अन्त्यविधिस त्याच्या
लूगडं कफनाला

सत्कार भीमबाच्या
बॉरिष्टरीचा झाला
लूगडं नसे साधं
फेटा जरीचा नेसला

पानी अन देवाच्या
स्पर्शाच्या चढाइस
साथ तीची भीमाच्या
मुक्तीच्या लढाईस

तो माउलीचा सूर्य
गरीबीत तळपला
त्याच्या विद्वतेने
भारत झळकला

लोचनी तीच्या स्वप्न
सात कोटी जीवाच
लढाई हक्काची
लढणाऱ्या भीमाच

तीचं दुःख मोजू मी
कुठल्या मापानं
तीच्या महान त्यागान
घटना लिहिली बापानं

तीच्या मुळे सूर्याचा
घडला उत्कर्ष
कप्प्यात हृदयाच्या
रमाईचा आदर्श

Sunday, September 14, 2014
Topic(s) of this poem: life
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success