प्रतिमा Poem by dhirajkumar taksande

प्रतिमा

Rating: 5.0

खुळे बींब आरश्याचे तोडलेस का असे
पोरखेळ आयुष्याचे मांडलेस का असे

हा लगाव भावनांचाआशेच्या शेजारी
ओढ जिवा होती तीला टाळलेस का असे

रोटी अन बेटीचाहा उपद्व्याप रे जगी
स्वप्नातल्या परीस तु जाळलेस का असे

कोण इथे जीव देयी जीव लावतांना
जीवलगा प्रेषितांना जाळलेस का अस

उजेडात चोरटेही पळती भयाने
श्वास पेटत्या दिव्याचे रोखलेस का असे

जीथे धरा आकाशाला वाटते मिळाली
तिथे मोती आसवांचे माळलेस का असे

स्वप्न नवे पाहतांना नग्न ही असावे
भग्न केले पामरांना तोडलेस का असे

Sunday, September 7, 2014
Topic(s) of this poem: image
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success