०००० *सप्तरंगी पतंग* ०००० Poem by Chaitanya Kanherikar

०००० *सप्तरंगी पतंग* ००००

०००० *सप्तरंगी पतंग* ०००० ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर०० ०स्वप्न मिठी, बाहुपाशात बंद, सखी साजणी संग०० रेशीम बंध चोरून अंग०० स्वप्निचेच स्वप्नरंग००. उमले मोगरा सकाळी, उंन पावसाच्या खेळी, इंद्रधनु आभाळी सप्तरंग ०० ००००. राग गाली तुझ्या विलसे रक्तचंदन लाली ००. कुठे तांबूस तांबडी फुले नारंगी ल्याली ००. रंगात आपल्याच दंग ०००. मखमाली सर्वांगी लपेटून पिवळ्या रंगी००. बहरुनी आली शेवंती पिवळी सर्वांगी ००. हळद क्षितिजी आले मावळतीचे रंग ००. किण किण पाचू चुड्यांचे स्पर्श गारठलेले ००. हिरव्या गालिची छुमकती पैंजण पाउले ००. ओल्या दवात शहारले कंपित सारे अंग ००. निळ्या नितळ नभांगणी डोंगर निळे, पाणी निळे ०० न्याहाळती नील कमळे, निळे चंचल डोळे ००. डोळ्यात निळ्या प्रीतीचे प्रतीबिंब निल रंग ००. स्फटिक शुभ्र फेसाळूनी उसळूनी ओसांडुनी वाहते झरे ००. पांघरुनी दव धुक्याचे केसांवरि तुरे ००. वस्त्रात ओढणीच्या रुपेरी रास रंग ००. वाट पाऊले जांभळी, वाटा जांभळ्या, जांभळीच्या झाडाखाली उलगडल्या ओठ कळ्या ००. परतीच्या पावलांनी उडाला सप्तरंगी पतंग ०००
००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर०० ००दिनांक: - ११ऑगस्ट२००६

POET'S NOTES ABOUT THE POEM
*सप्तरंगी पतंग* अर्थात मिलनाचा संकेत, अर्थात सप्तरंगांची ची उधळण, कवितेत सप्तरंगाचां वापर! ! !
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success