०० उरला ओला स्पर्श ००० Poem by Chaitanya Kanherikar

०० उरला ओला स्पर्श ०००

०० उरला ओला स्पर्श ०००
** द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
०० उरला ओला स्पर्श ०००
०० स्फटिक शुभ्र ठिकऱ्या
०० त्यातुन उडाले पारदर्शी तुषार
०० झुडूप हिरव्या गुडूप अंधार
०० गुहां करता पार
०० उरला ओला स्पर्श ०००
००
०० तू अन मी आतुर
०० असतील मित्र परिवार
०० वनसफरीचा लळां काही और
०० कानी शिरता वारे अंगी संचार
०० होता उरला ओला स्पर्श ०००
००
०० खळाळून वाहत कपारीत
०० डोंगर दाट गर्द हिरवाईत
०० उडवीत गारगोट्या तुडवीत
०० पाणलोटा मागे लोटत
०० उरला ओला स्पर्श ०००
००
०० कड्या वरून उसळत
०० कोसळता फुटत
०० जल प्रपात अविरत
०० हाती हात ओल्या मस्तीत
०० उरला ओला स्पर्श ०००
००
०० भावना अविरत
०० आवेग आवरत
०० सावली सावली
०० करवंदी जाळीत
०० उरला ओला स्पर्श ०००
००
०० रानवेली गुंफती श्वासात श्वास
०० मिसळला गंध शेवाळयात
०० थरथरत्या देहबोलीत
०० तू नि मी बाहुपाशांत
०० अन उरला ओला स्पर्श ०००
**चैतन्य कन्हेरीकर १५ऑक्टोबर२०१७

Sunday, October 15, 2017
Topic(s) of this poem: safari
POET'S NOTES ABOUT THE POEM
वर्षासहल आणि निसर्ग साक्षी प्रणय
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success