००मधुमालती००० Poem by Chaitanya Kanherikar

००मधुमालती०००

००मधुमालती०००
००द्वारा: -चैतन्य कन्हेरीकर
००मधुमाली ग तू केले लिंबावर घर
००फुलं पाकळ्या ग पानी आला बहर llधृll
००
००नागमोडी ग तुझा कमानी सुडौल
००पाचू हिरवा ग चुडा ल्याले मोती अमोल
००लाल पांढऱ्या चांदण्या सर्वांगी पांघर ll१ll
००
००कोठू कसा ग आला हा काळा भवर
००मधुमाली ग तुझ्या फुलं कळ्या सावर
००हिरवा पानाचा ग शालू त्यावरि पसर ll२ll
चैतन्य कन्हेरीकर १७एप्रिल२००६

Tuesday, August 8, 2017
Topic(s) of this poem: love
POET'S NOTES ABOUT THE POEM
मधुमालती सर्वांगी फुलली असता
काळा भुंगा त्यावर रुंजी घालतो
कविमनास विषय मिळाला.
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success