००संगीत सोहळा००० Poem by Chaitanya Kanherikar

००संगीत सोहळा०००

Rating: 5.0

००संगीत सोहळा०००
००द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
००संगीत सोहळा०००
००नभो मंडपी आज आकाशी
००अपूर्व सोहळा रंगला
००गायन वादन नर्तन रूपे
००श्री गजानन अवतरला llधृll
००
००वीणा बोले दिडदा दिडदा
००लपून पाहते हसून शारदा
००ॐकार नाद स्वयंभू उमटला १
००
००अति मधुर धून वाजे बासुरी
००पावा ऐकून बुजला श्रीहरी
००सिदूरवदन वेणू नादी रंगला २
००
००घन गंभीर बोले अवनद्धी
००मृदंग वाजवी दाता सिद्धी
००प्रथमेश तू तल्लीन होवूनि दंगला ३
००
००सुशिर साज संवादिनी वादन
००बाज आधुनिक तयासि देऊन
००जलदगती मृदु बोटे फिरवी निर्मला ४
००
००जन्मले अपत्य मृदुंगाचे
००तबल नामकरण त्याचे
००थाप टाकिता वीज कडाडे महाकाला ५
००
००धरती वरले अमृत गायन
००गंधर्व किन्नर डोलती ऐकून तानं
००मंगलमूर्ती तू गानंसमाधीत हरपला ६
००
००पाहोनि श्रींच्या पदचापल्या
००रंभा मेनका उर्वशी लाजल्या
००तिन्ही लोकि पूजती विश्ववरदाला ७
००
००नभो मंडपी आज०० ००
०० ०० श्री गजानन अवतरला llधृll
००चैतन्य कन्हेरीकर २२ऑगस्ट२००९

००संगीत सोहळा०००
Monday, August 7, 2017
Topic(s) of this poem: music
POET'S NOTES ABOUT THE POEM
श्री.आदिदेवक १४ विद्या ६४ कला अधिनायकास अर्पण. सदर च्या ७ गणेशमूर्ती हाताने बनवल्या आहेत.मूर्तिकार: श्री.चैतन्य कन्हेरीकर, श्रीम.कोयल कन्हेरीकर
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success