प्रेम नव्हते ते Poem by Amol Deokar

प्रेम नव्हते ते

*** प्रेम नव्हते ते ***

दिवसाची सुरूवात तुझा फोटो पाहून व्हायची
उठल्यावर तुला गुड मॉर्निंग करण्याची धडपड असायची
कधी तुझा रिप्लाय येईल याची वाट पहायची
ऑनलाईन स्टेटस पाहून हृदयाची धडकन वाढायची
कितीही दूर आसलीस तरी तू जवळ वाटायची
प्रेम नव्हते ते, केवळ आपुलकी वाटायची! ! 1! !
रात्री स्वप्नात आणि दिवसा जीवनात डोळे तुझाच शोध घ्यायचे
तुझे शब्द ऐकणायसाठी कान सावध व्हायचे
तुझ्या सर्व आवडी-निवडी मन लक्षात ठेवायचे
कधी ऑफिसमध्ये तर कधी ट्रेनमध्ये तुझे स्टेटस चेक व्हायचे
नेहमीच मनाला तुझी आठवण यायची
प्रेम नव्हते ते, केवळ आपुलकी वाटायची! ! 2! !
तुला भेटण्यासाठी मन व्याकुळ असायचे
तुझ्या भेटीसाठी मन नेहमीच वाट पहायचे
तो दिवस कधी येईल या विचाराने मन अधीर व्हायचे
त्यासाठी तुला माझे मन नेहमीच विनंती करायचे
तुला एकदा भेटण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे ही इच्छा असायची
प्रेम नव्हते ते, केवळ आपुलकी वाटायची! ! 3! !
तुला रोज कशी आहेस अशी विचारणा व्हायची
रोजच तू आनंदी असशील अशी अपेक्षा असायची
नेहमी तू बिज़ी आहेस म्हणून इग्नोर करायची
आज तरी खूप बोलूया अशीच आस लागायची
तुझ्याशी बोलताना वेळेची किंमत कळायची
प्रेम नव्हते ते, केवळ आपुलकी वाटायची! ! 4! !
तुझ्या वाढदिवसाची खूप वाट पहायचो
या वेळी स्पेशल गिफ्ट द्यायचं हे ठरवायचो
त्यासाठी खूप मेहनत आणि विचार करायचो
माझ्या स्पेशल गिफ्टने तुला थँक यू म्हणायचो
लोकांना हे प्रेम वाटेल हीच शक्यता असायची
पण प्रेम नव्हते ते, केवळ आणि केवळ आपुलकीच वाटायची! ! 5! !

- अमोल देवकर

प्रेम नव्हते ते
Monday, April 3, 2017
Topic(s) of this poem: love,love and friendship,marathi
COMMENTS OF THE POEM
Sandeep Dongre 03 April 2017

A beautiful poem on love. Thanks for sharing.

1 0 Reply
Amol Deokar 03 April 2017

your welcome!

0 0
Sandeep Dongre 03 April 2017

A beautiful poem on blooming love. Thanks for sharing.

1 0 Reply
Amol Deokar 03 April 2017

Thank you!

0 0
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success