०० औचित्य महिला दिनाचे ००० Poem by Chaitanya Kanherikar

०० औचित्य महिला दिनाचे ०००

०० औचित्य महिला दिनाचे ०००
००
००द्वारे: चैतन्य कन्हेरीकर
००
००औचित्य महिला दिनाचे साधूनs
००का बरळता उधळीता मुक्ता फळे l
००स्त्री स्वतंत्र, मुक्ती, आरक्षणं,
००संरक्षणाची खोटीचं मृगजळे llधृll
००
००जरि घेसी सखे तू, यानांतुन, झेप चंद्र-मंगळावरी l
००कुठे जाळिती तुझं, आरोप करुनी बंद दारी l
००देवदासी कधी तू, देवांची मुरळे ll१ll
००स्त्री स्वतंत्र..
००आजुनि बुरख्यात लपविसी देह, चंद्रमुख तुझे l
००किती सहशील आजुनि, अत्याचार दडपणाचे ओझे l
००तलाक म्हणोनि उखडतील तुजला, समजोनी बांडगुळे ll२ll
००स्त्री स्वतंत्र..
००शल्य चिकित्सा जरि करसी, देऊन अनेस्थेशिया भूल l
००खेडोपाडी तुझ्या नशिबी, अजुनि चूल आणि मुल l
००आजुनि गांजलेली तू, मागासलेली खुळे ll३ll
००स्त्री स्वतंत्र..
००असंतुलीत प्रमाणं स्त्री-पुरुष, जीवित जन्माचे l
००वैरीण होते माय मीचं तुज, जन्मा आधी मारते l
००आजुनि निष्पाप असहाय्य तू पुरुषी वर्चस्वा मुळे ll४ll
००स्त्री स्वतंत्र..
००टपली गिधाडे सभौती, विखारी नजरा तुजला चघळू पाहे l
००किती लाचार हतबल सखे तू, जरि विरोधून झगडू पाहे l
००कोठीवर होईल कोठवर, सौदा तुझा अल्पवयीन बाळे ll५ll
००स्त्री स्वतंत्र..
- चैतन्य कन्हेरीकर बुधवार, ८मार्च२०१७

POET'S NOTES ABOUT THE POEM
औचित्य महिला दिनाचे
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success