०० चार ओळी ०००० Poem by Chaitanya Kanherikar

०० चार ओळी ००००

०० चार ओळी ००००
००
००द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
००
००ऱ्हस्व असे ऱ्हास-स्व!
००दीर्घ दिसे प्रदिर्घ संकीर्ण!
००अक्षरी नसे काही अशुद्ध!
००बोध घेति प्रज्ञावान बुद्ध! १
००
००नसे उरता कशात जीवन!
००जीवन तरी ही नाही संपले!
००कुठे जगावे कसे कळेना!
००नकळत जीवन आहे रंगले! २
००
००रंगले सप्त रंगात!
००न उरला कुठला रंग!
००तरिही रंगवा मजला!
००क्षणिक तुमचा संग! ३
००
००सुखात दु: ख लपते!
००दु: खात सुख दिपवते!
००सुखात सुख दुखते!
००दु: खात सुख हसविते! ४
००
००शब्द संकेत!
००अशब्द वर्तमान!
००परिघ भविष्य भूत!
००शून्य००मौन००! ५
००
००मौनात सत्य उमगले!
००शब्दात सर्वां सांगितले!
००जन सर्वांना समजले!
००सत्य शब्दातून लोपले! ६
००
००एकांती रमावे!
००एकांती फिरावे!
००मौनि बसावे!
००सत्य जाणावे! ७
००
००एक थेंब दोन थेंब!
००पाऊस वारा!
००चिंब भिजे!
००ही वसुंधरा! ८
००
००धुंद गंध अति मदिर!
००ऋतु वसंत आसमंत!
००मोहर मोहर बहर बहर!
००अति आनंद अंतरी अनंत! ९
००
००मी मागितले तू नाकारले!
००न मागता तिने देऊ केले!
००तू देऊ पाहिले मी न मागितले!
००नको आता मन रमले! १०
००
००नावडे ते दुर्लक्षावे!
००आवडे जे कार्य करावे!
००इतरांच्या फंदी न पडावे!
००सार्थकी जीवन जगावे मनोभावे! ११
००
- चैतन्य कन्हेरीकर दिनांक: १९८६मध्ये

Saturday, February 18, 2017
Topic(s) of this poem: fourth
POET'S NOTES ABOUT THE POEM
चारोळी
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success