००० ज्वालामुखीच्या उदरात ००० Poem by Chaitanya Kanherikar

००० ज्वालामुखीच्या उदरात ०००

००० ज्वालामुखीच्या उदरात ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

००ज्वालामुखीच्या उदरात चुकूनही पाहिलेसना डोकावून
००अतिखोल विवरामध्ये मी गेलोय सामावून

००ज्वालाग्राही मन तेव्हा नव्हतच मुळी भानावर
००चहू दिशांना करून संचार वारंगुनि केला कहर

००धुंद स्वच्छंद मनासह संचार मी स्वैर केला
००तरल कानोसा घेत निघालो प्रतिसाद मला जिथून आला

००कोठून कसा पोहोचलो येवून डोंगरमाथी शिखरावर
००रात्रकाळी सुन्नजीव व्याकूळ शोध भिरभिरती नजर

००धुमसत्या तांबूस-तांबड्या अतितप्त विवरात पाहिलं डोकावून
००होतीस तू तिथे आत मंद स्मिताने आवाहन केलेस हसून

००विलंब क्षणाचा न करता झेपावलो मी तप्त लाव्हा-रसात
००फसवलेस ००० ना मला तू मुळी नव्हतीसच आत

००तप्त रसातला उग्रधुंद दर्प आहे एकांत कारावास
००हवा आहे जोडीला मला फक्त तुझाच सहवास

००डोंगर माथ्याची ओढ झपाटून लागलीना तुला अनावर
००मंतरल्या चैत्रावेली तुझे मन नाही भानावर ०००

००ज्वालामुखीच्या उदरात आज तू पाहणार आहेस डोकावून
००पाताळी तप्त विवर कवेत माझ्या तुला घेणार आहे सामावून
००-चैतन्य कन्हेरीकर

००कर्जत(रायगड) २३एप्रिल१९८६

००० ज्वालामुखीच्या उदरात ०००
Monday, December 19, 2016
Topic(s) of this poem: suspense
POET'S NOTES ABOUT THE POEM
वयाच्या २०व्या वर्षी कोवळ्या तरुण वयात काही सुप्त
अव्यक्त इच्छा मनात घर करून असतात.होतकरू युवकांची
जशी मनस्थिती असते, माझीही तशीच होती.ज्या अतृप्त, अव्यक्त
प्रबळ इच्छा प्रत्यक्ष समाज संसार व्यवहारात मन पूर्ण करू शकत
नाही.असे मन कल्पनेच्या दुनियेत भरारी घेऊन, अतृप्त वासना
तृष्णा पूर्ण करू पाहते
एका गूढ मनाची तृष्णा ०००
COMMENTS OF THE POEM
Geetha Jayakumar 19 December 2016

Khoop chaan aahey hi kavita. I loved it.

4 0 Reply
Chaitanya Kanherikar 16 August 2021

Thank you v much Geetha ji..

0 0
Chaitanya Kanherikar 19 December 2016

धन्यवाद गीथाजी! आपल्या प्रतिक्रियेवर मी आनंदी आहे!

0 0
M Asim Nehal 19 December 2016

The suspense was well maintained throughout the poem..Nicely conceived and aptly described....The large heart of the volcano can accommodate one and ll.

3 1 Reply
Chaitanya Kanherikar 16 August 2021

Thank you v much M Asim Nehal ji..

0 0
Chaitanya Kanherikar 19 December 2016

Thank you v Much Mohammed Ji for reply! I am happy to see your comment!

0 0
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success