Pratyekachya Manat Ek Mastani Aste..... Poem by mayur jadhav

Pratyekachya Manat Ek Mastani Aste.....

प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत: शी बोलायची असते
लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते
लोक म्हणतात हा व्यभिचार आहे
जानून बुजुन केलेला एक अविचार आहे
बोलनारे लोक खोटारडे असतात
स्वतः पासून सुध्हा काही तरी लपवत असतात
करतील तरी काय, सगळेच बाजिराव नसतात
लोक नेहेमी असेच वागतात,
बजिरावाचे प्रेम ग्रेट म्हणतात
तुमच्या आमच्या चारित्र्यावर शिन्तोडे उड़वतात
येता जाता नैतीकतेचे डोस पाजतात
प्रत्येकाला ठाऊक असते मस्तानी आपली होणार नाही,
सगळ्याचेच नशीब काही तेवढे थोर नाही
तरी ही आपली मस्तानी जपायची असते
मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवायची असते! !

Thursday, April 20, 2017
Topic(s) of this poem: marathi
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success