घडलंय-बिघडलंय Poem by Shubh Salunkhe

घडलंय-बिघडलंय

सा-यांच्याच नकळत...

कळलंय काही,

घडलंय काही अन्...

बिघडलंय काही ॥धृ॥

अंगवळणी पडलेले स्वभाव

अन् ते क्षणभंगूर सुखसोहळे

वाट्याला आहे काही नि

सारं सारं आज,

हरवलंय काही...

कारण,

घडलंय काही नि बिघडलंय काही ॥

वेगळं असं काही

दिसतच नाही

सुगंध प्राप्तीचा इथे

विरतच नाही

कारण,

उगवलंय काही नि...

मावळलंय काही...

म्हणून तर,

घडलंय काही अन्

बिघडलंय काही ॥

- शुभम साळुंखे, धुळे

COMMENTS OF THE POEM
Be the first one to comment on this poem!
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success