।। प्रतिक्षा ।। Poem by Rajeev Deshpande

।। प्रतिक्षा ।।

गडगडणारे गडद काळे मेघ दाटती आकाशी
लखलखणारी वीज मागुनि आसमंत प्रकाशी

भेगाळलेली अवनी खाली तहानलेली अधाशी
समस्त जीवांचे आतुर लोचन बघती आकाशी

झाली वसुंधरा ढेकुळांचा विस्तिर्ण प्रदेश जरी
शिडकाव्यांनी भिजता देते गर्द हिरवळ पायाशी

सुखसमृद्धी दुथडी वाहते बरसता पर्जन्य देशी
पसरे वास कस्तुरी मातीचा माती ती बावनकशी

कोसळो पर्जन्यधारा भरभरोनी त्या अमृतराशी
तृप्त होवो हरेक जीवजंतू कोणी न राहो उपाशी

आशाळभूत देशवासी प्रार्थना करती देवापाशी
भारत भूची अर्थ व्यवस्था निगडीत पावसाशी

पावसाळे येतील जातील ढग जमतील आकाशी
असो जगत नाशवंत प्रतिभा शाश्वत अविनाशी

Friday, May 15, 2015
Topic(s) of this poem: rainy season
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success