**कधी कधी ** Poem by Lyrics Swapnild Chatge

**कधी कधी **

*** कधी कधी ***

कधी कधी वेडे मन का हरवते,
कधी कधी एकटे एकटे झुरते;
कधी कधी वाट हळवी चालताना,
का अशी पून्हा संपते कधी कधी...

कधी कधी भावनेच्या सागरात बुडते,
कधी कधी शब्दाच्या लहरीत तरंगते;
कधी कधी काव्यातील अबोल भाव,
न बोलता सारे जाणून घेते कधी कधी...

कधी कधी रेशीम स्वप्न उसवते,
कधी कधी आठवाचे क्षण सुलगते;
कधी कधी नकळत का पून्हा असे,
अलगद हातून हात सुटते कधी कधी...

कधी कधी मन एकातात झूरते,
कधी कधी सावलीस बिलगते;
कधी कधी रेतीसारखे का असे,
हातून पून्हा ढासळते कधी कधी ! !

www.aishwswapn143.blogspot.com

**कु.स्वप्नील चटगे.**
(अबोल मी)
दि.16.11.2014.
Thanks Harsh....
- - - - - - - - - - - - - - - -

Friday, December 19, 2014
Topic(s) of this poem: Love
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success