॥ राधिका ॥ Poem by Rajeev Deshpande

॥ राधिका ॥



श्यामल कुंतल दाटी
ललाटी लट लटके
डाळींबी त्या ओठांची
चटक लावती चटके ॥

कालिंदीच्या तटावर
नजर भिरभिर भटके
तनमन नटखट प्रगट
मटक मटक मटके ॥

स्वर भाळती बासुरीचे
उशीर मोहनाचा खटके
चटपटीत लगट सांगे
रुसणे तुझे ग लटके ॥

पदन्यास तो लटपटीत
वस्त्राभूषण निटनेटके
गोपिकांच्या गराड्यात
लावण्य तुझे ग हटके ॥

~ राजीव निळकंठ देशपांडे

Sunday, June 1, 2014
Topic(s) of this poem: love
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success