।। कसोटी ।। Poem by Rajeev Deshpande

।। कसोटी ।।

असंख्य खळगे वाटेवरती
दमछाक उसासे हाय
तरीही रेटित जाणे आता
करणार दुसरे काय?

आला काळची विपरीत
धीर सुटतचि जाय
झाले मन सुन्न आता
जागीच थबकती पाय

धूसर झाली आशा आता
विफलता मन खाय
अंधारल्या दिशा दाही
झाले जीवन असहाय

हीच ती घडी कसोटीची
व्याकुळता मन गाय
उभी यशश्री माळ घेऊनी
देईल प्रतिकूलता न्याय!

~राजीव निळकंठ देशपांडे

Wednesday, March 26, 2014
Topic(s) of this poem: life
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success